जमिन नावावर करून देण्यासाठी एकाला बेदम मारहाण, हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईसह ६ जणांना पौड पोलीसांनी ठोकल्या बेड्या


पौड : मुळशी तालुक्यातील दारवली सुर्वेवाडी येथे जमीनीच्या कारणांवरून हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई व यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यास दमदाटी करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

ही घटना दारवली परिसरात मंगळवारी (ता. ०१) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रदिप शिवाजी बलकवडे वय – ३५, व्यवसाय- शेती रा. दारवली, ता.मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी धनंजय देसाई, रमेश जायभाउ, श्याम सावंत, रोहित पुर्ण नाव माहीत नाही रा. दारवली ता. मुळशी इतर अनोळखी १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.

तसेच पौड पोलिसांनी यात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई सह सहा जणांना मंगळवारी (ता. १) उशिरा अटक केली असल्याची माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारवली ता. मुळशी ग्रामपंचायत हद्दीत प्रदीप बलकवडे व त्यांचे कुटुंबीय राहतात. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रदिप बलकवडे हे गावातील सचिन संभाजी ठोंबरे यांचे घरात बसले होते.

यावेळी वरील आरोपी व त्यांचे काही साथीदार हे पिस्टल, तलवार, लोखंडी रॉड, काठया घेऊन त्या ठिकाणी आले. यावेळी रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहीत व त्याचे इतर १० ते १५ साथीदारांनी घरात घुसून बलकवडे यांना बाहेर ओढत आणुन “ तु तुझी जमीन धनंजय देसाई यांना लिहुन ६६ दिली नाहीस तर तुला व तु तुझ्या पुर्ण कुटूंबाला खलास करून टाकण्यास आम्हाला सांगितले आहे म्हणाले.

जमीन लिहुन देण्याचे कारणावरून बलकवडे यास श्याम सावंत याने पिस्टल दाखवुन व इतरांनी तलवार, लोखंडी रॉड, काठ्या घेवुन ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून दुखापत केली आहे.

यावेळी आरडाओरडा होताना रस्त्याने जाणाऱ्या लोकांची गर्दी जमली असता आरोपींनी बघणाऱ्यांच्या दिशेने तलवारी कोयते दाखवून तुम्ही येथे थांबला तर तुमचेही काही खरे नाही, असे ओरडत दहशत माजवली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, हवेली उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवसभर पौड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ताफ्याची मोठी गर्दी होती. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव तपास करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!