Hindkesari Manya : अपराजित योद्धा काळाच्या पडद्याआड! बैलगाडा क्षेत्रातील हिंदकेसरी मन्या बैलाचा मृत्यू, बैलगाडा प्रेमींवर शोककळा…
Hindkesari Manya : राज्यातील बैलगाडा प्रेमींवर आठवडाभरात दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झाले आहे. मन्याच्या निधनानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं निधन झाले. त्यानंतर आज पुन्हा एकदा बैलगाडाप्रेमींच्या कानावर दु:खद बातमी आली आहे.
बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झालं आहे. मन्याच्या निधनानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे. यावेळी बैलगाडा मालक राजू जवळेकर यांनाही अश्रू अनावर झाले. Hindkesari Manya
पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला मन्याने मालकाला वेगळी ओळख निर्माण दिली होती. मन्या प्रत्येक घाटाचा मानकरी ठरला होता. मन्याच्या अंत्यविधीला मोठी गर्दी उसळली होती. मन्या बैलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खेड तालुक्यातील ढाण्या वाघ हरपला. बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा हिंदकेसरी मन्या तूझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडत आहे. मन्या तू परत येना, अशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत.