‘मातोश्री’ वरील बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदींचा हस्तक्षेप, नेमकं काय घडलं?


मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असताना मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मध्येच हस्तक्षेप करत थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

मावळत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाकरे गटांच्या या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याने संताप व्यक्त केला. आणि याचमुळे पक्षातील मतभेद थेट ठाकरेंसमोर उघड झाल्याचं दिसून आलं. मात्र या बैठकीत असं काहीच घडले नसल्याचा दावा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभेच्या जागेबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संभाव्य वाद टाळण्यासाठी सावध भूमिका घेतली. या घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे खासदारांना देत होते. या दरम्यान ठाकरेंच्या संबोधनामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत हस्तक्षेप केला.

मात्र खासदार संजय राऊत यांनी या बैठकीत असे अजिबात काही घडलेली नाही. शिवसेनेत अंतर्गत मतभेद नाहीत किंवा कोणाबाबत नाराजी ही नाही. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेते म्हणून ज्यांची नियुक्ती केली त्यातील आपण एक नेते आहोत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांचे नाते काय आहे हे सर्वांना माहित आहे असं त्यांनी म्हटलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!