मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा…!
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याबाबत देशातील एकूण 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. या याचिका न्यायालयाने फेटाळत केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे.
सीबीआय आणि ईडीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज लंच ब्रेकनंतर सुनावणी घेण्यात आली. 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजकीय पक्षांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून युक्तीवादाला सुरुवात झाली.
ईडी आणि सीबीआईच्या प्रकरणात देशात 6 पटीने वाढ झाली आहे. मात्र फक्त 23% लोकांना शिक्षा झाली आहे. याद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे.
Views:
[jp_post_view]