अतिक अहमदच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट लागू ! मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दिल्या गृह खात्याला सूचना…!


लखनौ :अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची शनिवारी रात्री हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे, राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!