हिरोईन आणि २० कोटी!! धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा शर्मां यांनी सगळंच सांगून टाकलं…

बीड : माझगाव सत्र न्यायालयात धनंजय मुंडे यांच्यावर पत्नी असल्याचा दावा करत न्यायालयात लढा देणाऱ्या करुणा शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत १९९६ पासून सहजीवन सुरू केलं होतं. आमच्याकडे जॉइंट बँक अकाउंट आहे.
तसेच गृहकर्जात ते जामीनदार आहेत. मृत्युपत्र आणि स्वीकृतीनामा यासारखे कागदपत्रांवर त्यांची सही व अंगठा आहे. हे सगळं मी न्यायालयात सादर केलं आहे. मुंडे हे आपले प्रकरण दडपण्यासाठी एका व्यक्तीला २० कोटी रुपये देण्यास तयार होते. याशिवाय धमक्या, बनावट कागदपत्र आणि मानसिक त्रासासंबंधी गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच मला एक चित्रपट मिळाला होता. मी तो नाकारला कारण पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण माझे जीवन त्यांनी रस्त्यावर आणलं. आज ते घरात सुखात आहेत आणि मी न्यायासाठी लढतेय. माझ्यासोबत लग्न करणाऱ्या व्यक्तीला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते. असा धक्कादायक आरोप देखील त्यांनी केला आहे.
जर माझ्याकडे खरे पुरावे नसते, तर मी समोरच आले नसते. हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न झाले, पण आता मी खरे पुरावे आणि काही रेकॉर्डिंग्स लवकरच माध्यमांसमोर आणणार आहे. मी आणि माझ्या मुलांना धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या नावावर काही नाही, आणि दलाल मंडळींनी संपूर्ण प्रकरण हाताळले आहे. न्याय मिळेपर्यंत मी झगडणार. असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादाला मोठं वळण लागलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने यापूर्वी करुणा शर्मा यांच्यासाठी महिन्याला २ लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता. यामुळे सध्या धनंजय मुंडे सगळीकडूनच अडचणीत आले आहेत.