चिकन बनवलं नाही म्हणून नवऱ्याने इतक मारलं की तिचा जीवच गेला, धक्कादायक घटनेने सगळेच झाले सुन्न….


ओडिशा : ओडिशा राज्यातील ढेंकनाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. नाॅनव्हेज खाण्याची नवऱ्याची इच्छा होती. तो घरी आला, तर बायकोने चिकन करी केली नव्हती. नवऱ्याला आला प्रचंड राग. त्या रागाच्या भरात बायकोला ताकदीने कानाखाली लगावली. इतकं मारलं की तिचा या घटनेत जीवच गेला आहे. या घटनेने सगळेच हादरले आहेत.

याबाबत माहिती अशी की, रविवारी बाजारातुन त्याने चिकन आणले आणि बायकोला ते बनवायला सांगितले. मग तो घराबाहेर गेला. तो रात्री घरी परतला आणि त्याने पाहिले की कुणीने चिकन करी बनवली नाही, यामुळे त्याला खूपच राग आला. हा राग त्याला अनावर झाला नाही.

रागाच्या भरात त्याने आपल्या बायकोला इतकी जोरदार कानाखाली मारली की, ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध पडली. त्यानंतर जेना तिथून पळून गेला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

35 वर्षीय कुणी पिंगुआ ही तीन मुलांची आई होती. तिचा नवरा, 40 वर्षीय जेना पिंगुआ, रोजंदारी मजूर होता. जेना रात्री सुमारे 3 वाजता घरी परतला. त्याने पाहिले की त्याची बायको जमिनीवर पडली आहे आणि हलत नाही. जवळून पाहिले, तेव्हा कुणीचा श्वास थांबला होता. तो पुन्हा पळून गेला.

सकाळी मुलांनी आपल्या आईला जमिनीवर पडलेले पाहिले, तेव्हा ते घाबरले. ते मोठमोठ्याने रडायला आणि ओरडायला लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी घरी आले आणि आतले दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र तिचे निधन झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!