महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार!! आता आजपासून ‘या’ 20 जिल्ह्यांना ऑरेंज-रेड अलर्ट, जाणून घ्या…

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असून धरणे देखील लवकरच भरतील असे सांगितले जात आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची हजेरी जोर धरत आहे.

हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसामुळे शेतकरी आणि सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सगळी कामे ठप्प झाली आहेत. पुढील काही दिवस वातावरण असंच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता अधिक असल्यामुळे या भागातील लोकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आजपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

तसेच पुणे, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर यांसह काही इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला गेला आहे. पुणे जिल्ह्यात सगळीकडे तीन दिवस सलग पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, पालघर, हिंगोली, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ वाशीम या जिल्ह्यांमध्ये विजासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
यामुळे सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्कालीन उपाययोजना जलद अंमलात आणाव्यात. रस्ते, पूल, वीज पुरवठा आणि इतर मूलभूत सेवा यांचा सतत आढावा घेत राहावा, याबाबत अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता देखील आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.