दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी..

नवी दिल्ली : सध्या मान्सून संपूर्ण देशात दाखल झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उशिरा का होईना पण मान्सूनने चांगले आगमन केले आहे. आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पाडला. दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.
त्यामुळे नागरिकांना उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की २ जुलैपर्यंत फक्त हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
दिल्लीत पावसाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. दोन ते तीन भागात हलका पाऊस तर काही भागात सूर्यप्रकाश. लोक मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, काल दिल्लीचे कमाल तापमान ३६.४ अंशांवर सामान्यपेक्षा एक अंश कमी होते आणि किमान तापमान २८.१ अंशांवर सामान्य तापमानापेक्षा एक अंश कमी होते. अजूनही काही ठिकाणी उष्णता जाणवत आहे.
दिल्लीत सरासरी ०००.१ मिमी पावसाची नोंद झाली, तर पालममध्ये ०१३.८ मिमी, आयानगरमध्ये ०२४.६ मिमी आणि नजफगढमध्ये ००२.० मिमी पाऊस झाला. सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत पाऊस झाला.
उर्वरित भागात पावसाची आस लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडेल अशी अपेक्षा लोकांना आहे.