दौंड तालुक्यात पावसाचे थैमान ; पुणे -सोलापूर महामार्गावरून इनोव्हा गाडी गेली वाहून..।

भिगवण : दौंड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व अक्षरशः थैमान घातले आहे. या वादळी पावसाने रविवारी (ता.२५) रोजी पुणे -सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली येथील पुलावर पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. या पुरामुळे महामार्गावरून इंदापूर दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडी पुरात वाहून जाऊन अडकून पडली आहे.

पुणे – सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या पावसाने हाहाःकार उडाला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती तयार झाली आहे. दरम्यान पावसाच्या हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Views:
[jp_post_view]