उष्माघातामुळे जाऊ शकतो जीव, उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी…!

पुणे : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यासह देशातल्या अनेक शहरांत उष्णतेची लाट येणार असा इशारा देण्यात आला आहे. या दिवसांत बहुतेक लोकांना उष्णता वाढल्याने उष्माघाताचा त्रास होतो. उष्माघात इतका धोकादायक असतो की, मृत्यु देखील होण्याची शक्यता असते. दरम्यान उष्माघाताचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.



उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा :
1) उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवावे.
2) उन्हात काम करताना कायम पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
3) तुम्ही फार उन्हात काम करत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
4) ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
5) ओआरएस , लस्सी, ताक, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचे सेवन करावे.
6) वेळोवेळी थंड पाण्याने अंघोळ करावी.
या गोष्टी करू नका :
1) लहान मुलांना बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात फार वेळ ठेऊ नये.
2) बारा ते तीन या कालावधीमध्ये फार उन्हात फिरू नका.
3) गडद व घट्ट कपडे घालू नयेत.
4) जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे करू नये.
5) घरात मोकळी हवा येऊ द्यावी.
6) शिळे अन्न खाऊ नये.
7) जास्त उष्णता असलेले पदार्थ व मांसाहार टाळावा.
