Heat Stroke : कृषी प्रधान हवेली तालुका नैसर्गिक ऱ्हासाने बोडका! तीव्र उष्माघाताचा परिणाम नागरीकांना ठरतोय त्रासदायक!!

जयदिप जाधव

Heat Stroke उरुळीकांचन : कृषी प्रधान तालुका म्हणून आपल्या ‘काळ्या आईची सेवा’ करण्याची बिरुदवली ऐकेकाळी मिळविणाऱ्या हवेली तालुक्यात निसर्गाचा होणारा ऱ्हास सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्सगाचा ,साधनसंपत्तीचा ,नैसर्गिक साधनांचा बेसुमार कत्तल होण्याचा प्रकार वाढल्याने तालुक्यातील हिरवाईची झालर दिवसेंदिवस लुप्त होत चालल्याने बोडकापण आलेल्या या तालुक्यात उन्हाळ्यातील उष्माघाताचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. निसर्गाचा विनाश होत असताना या भागातील ग्रामपंचायती निसर्गाचा संगोपनासाठी जागृत होणार काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यभरात उष्माघाताने कहर केला असताना ,पुणे जिल्ह्यात काही भागात तापमानाचा पारा ४० अंश गाठू लागला आहे. बारा महिने बायागती भाग असलेल्या पूर्वहवेली तालुक्यात उष्मघाताचा ज्वर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरीकांची शाररीक क्रियेवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे.दम लागणे, मळमळणे,चक्कर लागणे , असह्य होणे अशा प्रकारांचा शारीरीक वेदनांना निमंत्रण मिळत आहे. उष्माघाताची प्रचंड असह्यतेने शेतकरी, शेतमजूर व कामगार वर्गाची ससोहोपालट या उकाड्याचा हैराणतेने सुरू आहे तालुक्यातील प्रत्येक भागात नैसर्गिक आधिवास संपल्याने उष्म लहरेचे मोठे परिणाम नागरीकांना सोसावे लागत आहे. त्यामुळे सध्याचा परिणाम कारण उन्हाळा हवेली तालुक्यात तीव्रतेने नागरीकांना सहन करावा लागत आहे.

पूर्व हवेली तालुक्यात मागील दिड दशकांपासून नैसर्गिक समृद्धीतेची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट सुरू आहे. नैसर्गिक झाडा झुडपांची कत्तल , कायदे धाब्यावर बसवून सुरू असलेली वृक्ष तोड यांच्यावर नियंत्रण नसल्याने निसर्गाची मोठा ऱ्हास झालेला आहे. या ठिकाणी जमिनींना आलेला मोठा भाव, शहरीकरणाच्या नावाखाली सुरू असलेला कत्तलींचा नंगानाच , बेसुमार उत्खनन तसेच शेतकरी वर्गाची वृक्ष संवर्धनाची नसलेली अनास्थेने पूर्व हवेलीतील मुख्य नैसर्गिक शितलता नष्ट झाली आहे. पूर्व हवेलीत या नैसर्गिक साधनांचा होत असलेला विनाशिचा परिपाक म्हणून हिरवीईची विपुलता नष्ट झाली आहे. Heat Stroke
महामार्ग, गावे, डोंगराई तसेच लोकवस्ती झाडांच्या नष्टतेने पूर्णपणे ओसाड पडू लागली आहे. मुबलक हवा, अल्लाददायी पणा व ओलावा नष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या उन्हाळ्यात या बदलत्या नैसर्गिक छेडझाडीचे परिणाम हवेलीकर चांगलेच सहन करु लागले आहेत. हवेलीतील हिरवीईची पालवी नष्ट झाल्याने उष्माघाताने स्वास कोंडवत चालल्याची स्थिती हवेलीकर अनुभवत आहे.
ग्रामपंचायतींची उदासिनता?
पूर्व हवेली तालुक्यात नैसर्गिक संपत्तीचा विनाश होत असताना ग्रामपंचायतीही फारश्या वृक्ष लागवडी व संवर्धनास उदासिनता असल्याचे चित्र तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांत पर्यावरणाचा समतोलचेचा दृष्टीकोनच नसल्याने गावोगावे ही ओसाड दिसू लागली आहे. तालुक्यात तुलनात्मक परिस्थिती जाणून घेता अष्टापूर व सोरतापवाडी ग्रामपंचायतींचा कारभार वगळता नैसर्गिक आबाधिता राखण्यासाठी कारभाऱ्यांत फारसा उत्साह नसल्याची स्थिती आहे.