नवऱ्याच्या सततच्या टोमण्यांमुळे ‘हृदयात ब्लॉकेज’, महिलेची तक्रार पुणे पोलिस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल…!
पुणे : पुणे येथील धनकवडी परिसरात राहणाऱ्या महिलेने आपला पती आणि सासरच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचे कारण पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
पती आणि सासरकडच्या मंडळींनी मारलेल्या सततच्या टोमण्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे आपल्या हृदयात ब्लॉकेज तयार झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल झाली आहे याआधारे पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान , तक्रारदार महिलेने तक्रारीत हा सर्व प्रकार जुलै 2021 ते मार्च 2023 या काळात घडल्याचा दावा केला आहे. तक्रारदार महिला ही प्रतीक चोथे नामक इसमाची पत्नी आहे. प्रतीक आणि तक्रारदार महिला यांचा विवाह 2021 मध्ये झाला. लग्नानंतर ही महिला पतीसोबत राहू लागली. मात्र या काळात पती आणि साररच्या मंडळींकडून आपला सातत्याने त्रास होऊ लागला. सातत्याने टोमणे, मानसिक त्रास, हिण वागूणक यांद्वारे आपला मानसिक छळ करण्यात आला. या त्रासामुळेच माझ्या हृदयात ब्लॉकेज आढळल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पुण्यातील सहकारनगर पोलीसांनी प्रतीक चोथे, दिलीप चोथे, अंजली क्षीरसागर, वैशाली शिंदे, विद्या भगत, रुपाली तोडमल अशा सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.