Health News : बटाटा चिप्स खाणारांनो सावधान!! संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर, वाचून बसेल धक्का…

Health News : बटाटा चिप्स जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मात्र तुम्हाला माहितीय का? बाजारात बटाटा चिप्सचे अनेक रंगीबेरंगी पॅकेट्समध्ये उपलब्ध असून ते चवीला चवदार असले तरी आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नाहीत. पॅकेट चिप्स आरोग्यासाठी हानिकारक असतात.

या संदर्भात अनेक संशोधने यापूर्वीच समोर आली आहेत, ज्यात या वस्तुस्थितीची पुष्टी झाली आहे. आता एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की पॅकेज केलेले बटाटा चिप्स या लोकांसाठी देखील हानिकारक आहेत आणि एका मोठ्या कंपनीने यावर कठोर कारवाई देखील केली आहे. Health News
पॅकेज केलेल्या बटाटा चिप्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज, मीठ, सोडा आणि फॅट्स असतात. या गोष्टींमुळे चिप्स आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. यामुळे वजन वाढू शकते. एका प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चिप्सचा प्रसिद्ध ब्रँड ‘लेज’ ने त्याच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या फ्लेवरच्या चिप्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यामागचे मुख्य कारण काय? याबद्दल अधिक जाणून घ्या..

युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ने फ्रिटो-ले यांना त्यांच्या ‘क्लासिक बटाटा चिप्स’ परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. या चिप्समध्ये अशी ऍलर्जीन आढळून आली आहे जी पॅकिंगमध्ये घोषित केलेली नाही.
हे प्रकरण ओरेगॉन आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये वितरीत केलेल्या काही चिप्सशी संबंधित आहे. हे दुधाची ऍलर्जी असलेल्या लोकांना हानी पोहोचवू शकते. मुलांमध्ये ही ऍलर्जी सामान्य आहे.
पॅकेट चिप्सचे तोटे..
कॅलरीज वाढल्यामुळे वजन वाढते.
सोडियमचे प्रमाण वाढल्याने बीपी, हृदयविकार, किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो.
अस्वास्थ्यकर चरबीमुळे कोलेस्टेरॉल वाढते.
पॅकेट चिप्स हे देखील वृद्धत्वाचे कारण असू शकते.