Health News : काळजी घ्या! चीननंतर, न्यूमोनियाने इतर देशांमध्येही केला कहर, भारतात देखील घालणार धुमाकूळ? जाणून घ्या लक्षणे..
Health News : कोरोनाच्या कहरातून देश सावरत असतानाच आणखी एका गूढ आजाराने हल्ला केला. हा धोकादायक विषाणू चीनमध्ये पसरला असून त्याला मिस्ट्री व्हायरस म्हणून ओळखले जाते. चीनमधून सुरू झालेला हा आजार आता अमेरिकेत पसरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला व्हाईट लंग सिंड्रोम असे नाव दिले आहे. हा गूढ आजार हळूहळू जगभर पसरत आहे. सर्वात जास्त या आजाराचा परिणाम लहान मुलांना होतो. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया जीवाणू या आजाराचे मुख्य कारण असू शकतात. या आजाराचा माणसाच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. Health News
यामुळे बाधित रुग्णांच्या फुफ्फुसांना सूज येते आणि ते पांढरे दिसू लागतात. वास्तविक, एक्स-रे घेतल्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये फुफ्फुसे काळे दिसतात, परंतु या विषाणूने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसे पांढरे दिसतात, म्हणून त्याला हे नाव देण्यात आले आहे.
व्हाईट लंग सिंड्रोमची लक्षणे काय?
सर्दी आणि खोकला
सौम्य ताप
थंडी जाणवणे
श्वास घेण्यात अडचण
सतत छातीत दुखणे
सर्व वेळ थकवा जाणवणे
दरम्यान, बहुतांशी लहान मुले या आजाराला बळी पडत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे मुलांची कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती हळूहळू विकसित होते.
म्हणजे एक प्रकारे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत, कोणताही विषाणू प्रथम कमकुवत प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. या कारणास्तव लहान मुले या आजाराचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.