दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी आरोग्य विभाग करणार महिला आयोगासमोर अहवाल सादर, प्रकरणातील वास्तव येणार समोर..

पुणे : दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्यात वातावरण तापले आहे. याबाबत अनेकांनी आंदोलने करून कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत कारवाई होणार आहे.
आता या प्रकरणी राज्य महिला आयोगाने घेतलेली दखल आणि आरोग्य विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, आरोग्य उपसंचालक व पोलिस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत संबंधित राज्याच्या वतीनेची समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल यावेळी सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवला आहे त्यात जबाबावर देखील चर्चा केली जाणार आहे. यामुळे या घटनेबद्दल अजून माहिती समोर येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. दरम्यान, पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला.
तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिलेला तात्काळ उपचार न देण्याचा गंभीर ठपका राज्य शासनाने नेमलेल्या समितीने ठेवला आहे. दरम्यान, या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली.