मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच डोक्याला चेंडू लागल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू, मुंबईत दुःखद घटना..

मुंबई : क्रिकेट सामना खेळत असताना एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही दुर्देवी घटना मुंबईतील माटुंगा येथील दादरकर क्रिकेट मैदानावर घडली आहे.
जयेश सावला (वय.५२ ) असे मृत्यू झालेल्या क्रिकेट पट्टूचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता.८) दुपारी माटुंगा येथील दादरकर मैदानावर एकाच वेळी दोन सामने सुरू होते. दोन्ही सामने एकाच टी-२० स्पर्धेतील होते. ५० वर्षांवरील लोकांसाठी ही स्पर्धा होती. कुटची विसा ओखल विकास लिजंड कप असे या स्पर्धेचे नाव आहे.
दुसऱ्या सामन्यातील चेंडू जयेश सावला याच्या डोक्याला चेंडू लागला आणि तो तिथेच पडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
या अपघातात कोणत्याही प्रकारचा कट किंवा घातपात असण्याची शक्यता नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, या मैदानावर नेहमीच अनेक सामने एकाच वेळी खेळले जातात, त्यामुळे अनेक खेळाडू जखमी होत असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा अपघातात एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.