पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन केली आत्महत्या, खिशातील सापडलेल्या गोष्टींमुळे गूढ वाढलं….

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज रांजणगाव याठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेऊन आल्यानंतर एका तरूणाने आत्महत्या केली. तरूण आधी आषाढी एकादशीनिमित्त वारीला जाऊन आला. नंतर घरात येऊन त्यानं आयुष्य संपवले.

याबाबत आता तरूणाने आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे. धनंजय आत्माराम पडघम असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी तो गेला होता. यावेळी सगळं काही ठीक होतं, त्यानं व्हिडिओ शूट करून शेअर केला.
या व्हिडिओमध्ये पंढरपूर आणि वारीचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत. तो पुन्हा छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज रांजणगावात परतला. असे असताना त्याने रात्री घरातच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तपासणी केली असता पोलिसांना धनंजयच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले. यामुळे नेमकं काय घडलं याबाबत सगळे हादरले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. त्याने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचे कारण काय? पंढरपुरात जाण्यापूर्वी त्याचा कुणासोबत वाद झाला होता का? त्याला कोणत्या गोष्टीचा मानसिक त्रास होता का? याबाबत तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेने मात्र सगळे हादरले आहेत.