पंतगीच्या मांजाने घात केला! बायको-मुलासह बाईकवरून फिरायला गेला, पतंगाच्या मांज्याने गळाच कापला, अन्…

मुंबई : मकरसंक्रातीचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तिळगुळाचे लाडू आणि पतंग ही सणाची दोन खास वैशिष्ट्य आणि सर्वांनाच आवडणारी आहे. पंतग उडवण्याचा आनंद लहनांपासून मोठ्यापर्यंत अनेक लोक घेतात.

मात्र याच पतंगाच्या मांज्यामुळे अनेक दुर्घटनाही होताता दिसत आहेत.पतंगाच्या मांज्याने एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रविवार असल्याने आपला दहा वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना, एका पतंगाचा मांजा गळ्यात अडकला आणि गळ्यावर खोल जखम झाली.
दरम्यान, त्याला ९ टाके पडले आहेत. सुदैवाने बाईकवरून पडून वगैरे जास्त मोठी दुर्घटना झाली नाही, मात्र तरीही गळ्या टाके पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे काल रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांची पत्नी नितल आणि दहा वर्षाचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फेरफटका मारत होते.
त्याचवेळी संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान मधुबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पंतग महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. विक्रम डांगे हे कुटुंबासह बाईकवरून जात असतानाच एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि गळ्यावर चिर पडली.
चिर एवढी खोल होती की, बराच रक्तस्त्राव झालं, त्यांच्या गळ्याला ९ टाके पडले आहेत. पत्नीने लागलीच मांजा काढल्याने तसेच विक्रम यांचा बाईकचा स्पीड कमी असल्याने मोठी हानी झाली नाही.