रस्त्यावर उभा राहून लोकांना दाखवत होता मुलींचे फोटो, पोलिसांना कळालं अन्…,उडाली खळबळ


मुंबई : दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ए धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे हाय प्रोफाईल कांड उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

एक व्यक्ती रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना अडवत होती. त्यांना काही मुलींचे फोटो दाखवत होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता

मुकेश कुमार रामजी यादव (५०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून तो दलाल म्हणून काम करत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डॉ. दा. भ. मार्ग पोलीस पथकाने सोमवारी दयानंद बिल्डिंग परिसरात सापळा रचला होता.

       

यावेळी एक व्यक्ती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवून, त्यांना आपल्या मोबाईलमधील काही मुलींचे फोटो दाखवत होता. तसेच व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना शोधत होता.

आरोपी मुकेश यादव हा ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून त्या बदल्यात मोठी दलाली कमवत होता. ग्राहकांशी संपर्क साधण्याचं आणि त्यांना मुलींचे फोटो दाखवण्याचं काम करत होता. याच दलालीतूनच तो बक्कळ पैसा कमवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!