गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, केक कापला, नंतर जे घडलं ते…घटनेने उडाली खळबळ


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या घटनेने एका हत्येच्या घटनेने पिंपरी चिंचवड हादरली. ज्या चाकूने प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकूने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

मेरी तेलगू असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून दिलावर सिंह असं आरोपी प्रियकराचे नाव आहे.

प्रेयसीचा वाढदिवस १० ऑक्टोबर रोजी होता. तो साजरा करण्यासाठी आलेल्या प्रियकराने तिच्यासाठी केकही आणला होता. मात्र केक कापल्यानंतर त्या प्रियसीलाही ठार करण्यात आलं.

मिळालेल्या माहिती नुसार, मेरी तेलगू ही मुलगी डी मार्टमध्ये नोकरी करत होती. तर दिलावर सिंह हा एक हॉटेल व्यावसायिक आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र मेरी तेलगूचे आणखी कुणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने मेरी आणि दिलावर हे वाकड येथील एका लॉजवर भेटले. 10 ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस असल्याने तिने केक कापून सेलिब्रेशनही केले. त्यानंतर त्याच चाकूने आणि ब्लेडने दिलावरने मेरीवर वार केले आणि तिची हत्या केली. मेरी ही तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा त्याला संशय आला आणि त्या संशयाने प्रेमाचा द एन्ड केला.

प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर थेट कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!