पतीच बनला राक्षस! दोरीने आवळला पत्नीचा गळा, नंतर लोखंडी गजाने फोडलं डोकं, हडपसर येथील धक्कादायक घटना…


पुणे : हडपसरमधील महंमदवाडी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने यापूर्वी पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.

जया माने (वय ३५, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांनी याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पती अनिल पंढरीनाथ माने (वय ४२) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, माने पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणावरून खटके उडत होते. सततच्या छळाला कंटाळून जया यांनी यापूर्वी पोलिसांकडे धाव घेऊन पतीविरुद्ध दाद मागितली होती.

       

सोमवारी (२२ डिसेंबर) या वादाने उग्र रूप धारण केले. तू माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिलीस? असा जाब विचारत अनिलने जया यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अनिलने जया यांचा दोरीने गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

इतक्यावरच न थांबता त्याने जवळच असलेला लोखंडी गज उचलून त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात जया गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!