‘तो मला ब्लू फिल्म दाखवू…, हगवणे कुटुंबाला मदत करणारे चौंधे कुटुंबही आता लटकणार

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलं आहे.
आता चौंधे कुटुंबावर त्यांच्या सुनेने केलेले अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. या आरोपामुळे समाजातील एका संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.
पीडित सुनेने केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती सुयश चौंधे तिला ‘ब्लू फिल्म’ दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचा, तर सासू वैशाली चौंधे काळी जादू करत होती. याशिवाय, दीर संकेत चौंधे आणि पती सुयश चौंधे हे सासूच्या समोरच गांजा ओढत असत, असेही तिने म्हटले आहे.
या विवाहितेने पती सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्यावर २० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिला वारंवार शारीरिक मारहाण, मानसिक त्रास दिला जात होता, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, या सततच्या छळाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, ही बाब या प्रकरणाचे गांभीर्य दर्शवते. या घटनेमुळे कुटुंबातील संबंधांमध्ये आलेली विकृती आणि त्यातून होणारे गंभीर परिणाम दिसून येतात.
पीडित सुनेने जानेवारी २०२५ मध्ये खडक पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिने राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली. मात्र, महिला आयोगाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही राज्य महिला आयोगाने या प्रकरणात निष्क्रियता दाखवल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेकडून अशा गंभीर प्रकरणांमध्ये त्वरित आणि प्रभावी कारवाई अपेक्षित असते.