राजीनामा दिलाच पाहिजे!! कृषिमंत्री ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल २२ मिनिटे खेळत होते? अहवाल सादर..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात पत्ते खेळत असल्याने अडचणीत आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे.

यामुळे याबाबत सरकार याबाबत खुलासा करेल का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यामुळे आता तरी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार त्यांना का पाठीशी घालत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजीनामा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कोकाटे यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र अजूनही निर्णय होत नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. माणिकराव कोकाटे सतत वेगवेगळ्या कारणाने अडचणीत येत आहेत. अनेक वक्तव्य करून त्यांनी सरकारच्या देखील अडचणी वाढवल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!