रोहित पवार लागले कामाला! दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात? सगळंच समोर येणार…


नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत रोहित पवार हे सध्या दिल्लीत राहून एक महत्त्वाचे काम पार पाडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याची शक्यता बोलून दाखवली होती. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित पवार सध्या दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

सरकारने या अपघाताची चौकशी लावण्यापलीकडे फार काही केले नव्हते. त्यामुळे आता रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यास वेळ लागू शकतो, असे अनेकांनी सांगितले आहे. दरम्यान, अपघाताचा आज 20 वा दिवस आहे. अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही.

यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मात्र, या सगळ्यातून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. यामुळे प्रश्न तसेच आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!