हॉल तिकीट घेऊन निघाला पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू….


मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे एक दुःखद घटना घडली आहे. यामध्ये दहावीचा विद्यार्थी दीपांशु राजेश बौद्ध याचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे त्याच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. दीपांशु हॉल तिकीटचा प्रिंटआउट घेण्यासाठी आपल्या मित्रासोबत सायकलवर निघाला होता. यावेळी हा अपघात झाला.

पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्याला जोराची धडक दिली. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी दीपांशुला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे एकच धक्का कुटूंबाला बसला त्याची दहावीची परीक्षा सुरू झाली होती.

दरम्यान, या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. दीपांशुच्या कुटुंबीयांसाठी ही एक मोठी धक्का देणारी घटना ठरली आहे. हॉल तिकीट घेण्यासाठी तो मित्राच्या सोबत तुर्भे नाका रस्त्यावर जात असताना ही दुर्घटना घडली. डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला. यामुळे या मुलाचे आणि कुटूंबाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी डंपर जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरसतील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुढे आला आहे. यामुळे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होतं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!