तरुणांनो लागा कामाला ! MPSC च्या इतिहासातील सर्वांत मोठी भरती जाहीर, ८ हजार १६९ जागा…!


पुणे : MPSC चा वाद सध्या सुरू असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे.

यामुळे तरुणांना ही एक मोठी संधी आहे. यामध्ये गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. तर गट ब सेवा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

MPSC मध्ये केवळ 2 हजार पदे भरण्यात येत होती. यामुळे मोठी चुरस होत होती. आता ही संख्या वाढली आहे. पहिल्यांदाच आठ हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे तरुणांचे देखील स्वप्न पूर्ण होणार आहे.

एकाच अर्जाद्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामध्ये गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा २ सप्टेंबरला, तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपीक-टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!