शेती विकू न दिल्याच्या रागातून आईला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून शेतात पुरला अन् स्वतः…, घटनेने लातूर हादरलं


लातूर : तीन महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न झालं. आता झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा पर्याय मुलाने आईला सुचवला मात्र ७० वर्षाच्या आईने मुलास विरोध करत शेती विकू दिली नाही. याचा राग मनात धरून मुलाने आईला गळा आवळून संपवलं.

त्यानंतर शेतीतील उसात मृतदेह पुरला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातून समोर आला आहे. रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे याप्रकरणी मृत मुलावर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काकासाहेब वेणुनाथ जाधव असे ४८ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. मुलास वडिलोपार्जित ८ एकर शेती असून काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. चार बहिणी नंतर जन्मलेल्या एकुलता एक मृत आरोपी काकासाहेब यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं.

पण या लग्नात झालेला कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित थोडीशी शेती विकावी असा सल्ला त्याने आई समिंदराबाई वेळूणात जाधव यांना दिला. परंतु पतीच्या माघारी मी जमीन विकू देणार नाही असे सांगत त्याला आईने विरोध केल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने आईचा खून करून मृतदेह पोत्यात बांधला.

दरम्यान, उसाच्या शेतात खड्डा करून आईचा मृतदेह पुरला. त्यानंतर शेतापासून आठ किलोमीटर दूर जाऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेत त्याने स्वतःच आयुष्य संपवलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!