मोठी बातमी! विधानसभेचा काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला, या नेत्याची झाली निवड…
मुंबई : महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना मिळाल्याची माहीती समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे.
या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे.
विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे.
त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता.
जास्त संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. त्यानुसार आज विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहेत.