संत तुकाराम पालखी सोहळ्यात हवेली तहसिलदारांचा वारकरी सद्भाव! हरिणामाच्या महिमाचा घेतला अनुभव…!!

जयदीप जाधव
उरुळी कांचन : जगभरात वारकरी सांप्रादायाच्या श्रेष्ठत्वावरुन संशोधन, अभ्यास, चिंतन तसेच उपदेश या सर्व आत्मसंशोधनांनी वारकरी संप्रादाय हा जीवनशुध्दीचा मंत्र असल्याचा दावा केला जात आहे .या सर्व मौलिक संक्कारांत जीवनाचे संक्कार जडले असल्याने, वारकरी सांप्रदायाच्या भक्तिच्या वाटेवर अनेक विचारवंत, तज्ञ राजकारणी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी घेऊन भक्तिच्या रसात समरस होतात असा एक अनुभव आहे.
विज्ञानाच्या युगातही सांप्रदायाची शिकवण उद्याची उज्वल पिढी घडवेल असाही सांप्रदायिक शिकविणीचा काही दाखला दिला जातो. अशाच पद्धतीने प्रशासकीय जबाबदारी चा भाग म्हणून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाग घेणारे हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे यांचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वावर भक्तिचा अनुकरण करीत होता.
वारीची प्रथमच जबाबदारी पेललेले तहसिलदार किरण सुरवसे यांनी वारकऱ्याच्या वेशात ,पोशाखात तसेच कृतीत सांप्रदायिक सदभाव दाखविल्याने त्यांच्या या वारकरी कृतीची सोहळ्यात चांगलीच चर्चा होती.
संत सोपानकाकांच्या भेटीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा सासवड मुक्कामी! वैष्णवांचा मेळा अवघड दिवे घाट पार!!
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवार (दि.१५) रोजी हवेलीतून दौंड तालुक्यात मार्गस्थ असताना सुरवसे यांचा साधेपणा प्रशासनातील तसेच राजकीय मान्यवरांना मनोमनी भावला आहे. किरण सुरवसे यांची वारकरी वेशभूषा, पेहराव व वारकऱ्यांच्या प्रमाणे पायी सहभाग तसेच वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था म्हणून अन्नदान ठिकाणी केलेले जेवण यासर्व कृतीने पाहताच क्षणी उपस्थित भारावले आहे.
सोहळ्यातील विसंगवाद सोडविण्यापासून प्रशासकीय व्यवस्थेपासून सर्व अचून नियोजन सांभाळताना स्वतः हा वारकरी म्हणून वारकऱ्यांचा पाहिलेला सदभाव हा वारकरी सांप्रदायावर भरपूर काही सांगून जातो.