Haveli : हवेली तहसिल कार्यालयाचे दुसऱ्यांदा विभाजन! उरुळीकांचन, थेऊर, वाघोली मंडल कार्यालयाला लोणीकाळभोरला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी..!!


Haveli उरुळीकांचन : हवेली तहसिल कार्यालयाचे दुसऱ्यांदा महसूली विभाजन झाले असून हवेली तालुक्याच्या पूर्व हवेली तालुक्यातील ३ महसुल मंडल अंतर्गत ४४ गावांसाठी लोणीकाळभोर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या कार्यालयासाठी अप्पर तहसिलदार व महसूल सहाय्यक लिपीक हे दोन पदे मंजूर होऊन खर्चाच्या अस्थापनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पूर्व हवेली तालुक्यासाठी पुढील काही दिवसांत अप्पर तहसिल कार्यालय चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Haveli

हवेली तालुक्यात तहसिल कार्यालयाअंतर्गत ४० लाखांहून अधिक लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची मोठी कसब तालुक्याच्या तहसिल कार्यालयाला पेलावी लागत होती. कोथरुड, हडपसर, कळस, थेऊर, उरुळीकांचन , खडकवासला , वाघोली, खेड शिवापूर या ८ मंडल अधिकारी कार्यालय व १३० गावांचा सामावेश मिळून हवेली तालुक्याचे महसुली कामकाज करण्यात येत होते. Haveli

या कार्यालयीन कामकाजात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत ७ ते ८ हजार विविध अर्ज , शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणतः ४०० ते ५०० अर्ज तसेच नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत ६००० दाखले वितरण करण्यापासून केंद्रीय व राज्यातील मंत्री यांच्या राजशिष्टाचार कामे मिळून या तालुक्यातील दैनंदिन कामांचा निपटारा करण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी असलेल्या तहसिलदारपदावर कामकाजा प्रचंड ताण असल्याने तालुक्यातील नागरीकांची कामे प्रलंबित राहत होती .

हवेली तालुका तहसील कार्यालयाची स्थापन झाल्यानंतर तालुक्यातील पिंपरी चिंचवड, पू्र्व व पश्चिम हवेली तालुका मिळुन तालुक्यातील एकूण १६० गावांचा समावेश होता. त्यानंतर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा वाढता भार पाहता ऑगस्ट २०१३ रोजी पिंपरी चिंचवड मिळून ३० गावांना स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयास मंजूर शासनाने दिली होती. त्यानंतरही कार्यालयावर जवळजवळ ४० लाख लोकसंख्येचा भार असणे, हवेली तालुक्याचे वाढते विस्तारीकरण, नागरीकरण, विकास पाहता या तालुक्यासाठी सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेली प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी असून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यासाठी शहरी व ग्रामीण भागाला मिळून एकच तहसिलदार, गटविकास अधिकारी व कृषि अधिकारी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असणे, यामुळे खरेदी-विक्री व्यवहार, पुरवठाविषयक कामे, विविध परवानग्या, दाखले, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, बैठका, नियोजन, न्यायालयीन कामकाज इत्यादी महत्वाच्या कामांमधील विलंबासह जनतेच्या विकास कामांवर परिणाम होत होता.

त्यामुळे तहसिल कार्यालयाअंतर्गत वाढती लोकसंख्या, नागरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व हवेली तालुक्यातील थेऊर, वाघोली व उरुळीकांचन मंडळांचा सामावेश करुन पूर्व हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र महसूल कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे.

“हवेली तहसिल कार्यालयाची लोकसंख्या व कामकाजाची संख्या मोठी असल्याने सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांची कामे मार्गी लागण्यास वर्षोनुवर्षे चा कालावधी लागत होता. त्यासाठी तहसिल कार्यालयात नाहक नागरीकांना हेलपाटे घालून मनस्ताप सहन करावा लागत होता. पूर्व हवेली तालुक्यासाठी अप्पर कार्यालय सुरू झाल्याने नागरीकांची सर्व कामे ही निर्धारीत वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. अप्पर तहसील कार्यालयाप्रमाणे हवेली तालुक्यात प्रांत कार्यालयाचे विभाजन करुन हे कार्यालय या भागात सुरू होण्यास प्राधान्य देणार आहे.”

-अशोक पवार, आमदार शिरुर-हवेली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!