हवेली ग्रामपंचायत विभागात सणसणाटी निकालाची नोंद ! दिग्गज उमेदवार चितपट …!!

उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुण्याच्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. प्रारंभीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन भारतीय जनता पक्षाने तर जागांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसने बाजी मारली आहे.
ग्रामपंचायत गटातुन सर्वपक्षीय “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” मधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणराव कंद या दोघांनी बाजी मारली असुन, याच गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” चे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदवार विजयी झाले आहे.
विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार व विरोधी पक्षनेते अजीत पवार यांचे खंदे समर्थक, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पराभावाची चव चाकावी लागली आहे.
रामकृष्ण हेमचंद्र सातव – ४०५ मते
सुदर्शन जयप्रकाश चौधरी – २५८ मते
राहुल रामचंद्र काळभोर – २३६ मते
शुक्राचार्य हिरामण वांजळे -२११ मते