हवेलीत बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी अजित पवारांची मदत ! बंडखोरांच्या हवेली च्या अस्मितेच्या भाषेने राष्ट्रवादीला दमछाक !!

उरुळी कांचन : जयदीप जाधव
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ वर्षानंतरच्या निवडणुकीसाठी बाजार समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी तालुक्यात प्रचंड घौडदौड सुरू झाली आहे.तालुक्यातून कधी नव्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व बंडखोरांनी झिडकारण्याचा निर्णय घेऊन भाजप व भाजप नेतृत्वाशी जवळीक साधल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.अशातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा नेत्याचेही या बंडखोरांना पॅनेलमध्ये सामावून घेण्याचे आवाहन करुनही या बंडखोर नेत्यांनी या बड्या नेत्याला प्रतिसाद न दिल्याने बंडखोर नेत्यांच्या आव्हानाची चर्चा जिल्ह्यात नव्हे राज्यात होऊ लागली आहे.
बंडखोरांची ही आत्मसन्मान व स्वाभिमानाची भाषा तालुका स्विकारणार की, राष्ट्रवादी चे नेते या बंडखोरांचे उट्टे काढणार म्हणून निर्णायक तालुक्यातील निवडणूक ही अतितटीच्या वळणावर पोहचली आहे. हवेली बाजार समितीला तालुक्याचे अस्तित्व मिळेल की नाही, निवडणूक होणार नाही इथंपासून सुरूझालेल्या अनिश्चितांना पूर्णविराम मिळून १९ वर्षानंतर बाजार समितीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. तालुक्यात एक पिढी जाऊन दुसऱ्या पिढीला ही बाजार समितीची निवडणूक पाहण्याचे स्पप्न प्रत्यक्षात उतरले आहे. फक्त यापूर्वी आशिया खंडातील श्रीमंत असलेल्या या बाजार समितीचे किस्से चर्चेने ऐकिवात असले तरी आता मात्र प्रत्यक्षात अनुभवास येऊ लागल्याने निवडणूकीत सत्तेचा सारीपाट कसा राहिल म्हणून प्रचंड उत्सुकता तालुक्यात लागली आहे.
तालुक्यात १९ वर्षे बाजार समिती व १२ वर्षे कारखाना या संस्थांना मतदान करण्याचा अधिकार भूमिपूत्रांना न मिळाल्याने मिळालेल्या या संधीत काय, निर्णय घेणार म्हणून उत्सुकता शिगेला आहे. हवेली बाजार समिती ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून राजकीय साठेमारीत व सत्तेच्या चक्रात अडकुन तब्बल १९ वर्षे प्रशासकीय राजवटीत अडकून पडल्याने संस्थेला तालुकाचा लाभ अधिकार मिळतो की नाही म्हणून अनेक छुप्या संघर्षाला तोंड देत निवडणूकीपर्यंत पोहचला आहे. न्यायालयीन बाबी , कोर्ट कचेऱ्या, वृत्तपत्रांत सातत्याने बाजार समितीच्या अधिकारासाठी संघर्ष चालू ठेऊन अखेर १९ वर्षाच्या कालखंडानंतर या संस्थेची निवडणूक सुरू आहे.
अशातच या निवडणूकीत बरखास्त व अनागोंदी कारभारातील संचालक मंडळाची चौकशी कारवाई व संस्थेला राजकीय सत्ताकाळात मदत न करण्याचे धोरण म्हणून राष्ट्रवादी ला तत्कालीन बाजार समितीतील काही संचालकांनी सवतासुभा निर्माण करीत वेगळे जाण्याचा निर्णय घेऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे.हाच निर्णय या बंडखोर नेत्यांनी स्वाभिमान म्हणून जपण्याचा निर्णय घेऊन बाजार समिती अथवा कारखाना या संस्था तालुक्याच्या अधिपत्याखाली रहाव्य म्हणून प्रयत्न केला आहे. आता हाच मुद्दा अनेक पिढ्या आपसांत निवडणूका होऊन ‘जो येईल तो आपलाच ‘ या फार्म्युल्याने एकाला समोर तर दुसऱ्याला पाठिमागे ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादी च्या अंगलट आली असून या बंडखोर नेत्यांनी संस्थांच्या अस्तित्वाच्या तडजोडीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक साधून भाजपशी स्थानिक पातळीवर युती करत राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न आता चर्चेत आहे.
राष्ट्रवादीने ही या बाजार समितीच्या निवडणूकीसाठी पक्ष निष्ठेचा मुद्दा उपस्थित करुन थेट अजित पवार यांना बंडखोरांसमोर मैदानात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतू हवेली तालुक्यातील दोन्ही ही सहकार संस्थांंना सत्ताकाळात मदन न केल्याचा मुद्दा हवेली तालुक्याची स्वाभिमानाचा विषय म्हणून पुढे करीत प्रचारात मुद्दा बनवित आहे.त्यामुळे स्वाभिमान
व निष्ठेचा मुद्दा राष्ट्रवादी च्या भ्रष्टाचार या बदनामीच्या मुद्दावर भारी पडत असून अजित पवार हे बंडखोरांच्या आव्हानाची हवा काढणार काय ? म्हणून निवडणूक पुढील दिवसांत लक्षवेधी ठरणार आहे.
…तर जिल्हा बँकेच्या निकालाची पुनरावृत्ती !
पुणे जिल्हा बॅकेच्या दिड वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत
भाजपने ‘क’ वर्ग प्रतिनिधी गटात एक चमत्कार घडविला
होता.बँकेच्या इतिहासात कधीच भाजपच्या उमेदवार ने विजयी होऊन बॅंकेत प्रवेश केला नव्हता.अजित पवार यांनी उमेदवाराला धडा शिकविण्याची भाषा वापरूनही अजित पवार यांचा तालुक्याने शब्द खोटा ठरवून दाखविला होता. आता बाजार समितीला अजित पवार यांच्या शब्दाला तालुका कसा प्रतिसाद देणार की ? जिल्हा बँकेच्या निवडणूकीची पुनरावृत्ती होणार म्हणून चर्चेचे बाण सुटू लागले आहेत.
Views:
[jp_post_view]