‘राष्ट्रवादी’ उमेदवारांच्या पैशांच्या अर्थिक लाभासाठी प्रदिप गारटकरांची भूमिका दडलेली ! जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांना निलंबनाचा अधिकार गारटकरांना दिला कोनी !!


उरुळीकांचन : हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या संस्था हवेली तालुक्याची अस्मिता आहे. तालुक्यात सहकार सहकार चळवळ जिवंत रहावी, तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्कर्ष घडावा, तालुक्यातील सहकाराचे गतवैभव प्राप्त व्हावे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतकऱ्यांचा शेतमाल पोहचावा या उद्देशाने बाजार समिती शेतकऱ्यांच्या  अधिपत्याखाली असावी म्हणून सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून ज्या लोकांनी संस्थेच्या निवडणूकीसाठी मदत केली आहे. त्यांना एकत्र घेऊन हवेली बाजार समितीच्या निवडणूकीसाठी “आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी”या पॅनेलची उभारणा केली आहे. पॅनेल उभा केला म्हणून निष्ठेचे सोंग आणून राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या पैशांच्या अर्थिक लाभासाठी प्रदिप गारटकर यांनी विकास दांगट यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केल्याचा गंभीर आरोप हवेली ज्येष्ठ नेते के.डी.कांचन व बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड केला आहे.

सर्वपक्षीय पॅनेलचे नेते प्रा. के.डी. कांचन व बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड यांनी जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यावरील राष्ट्रवादी ने केलेल्या निलंबनाची कारवाई तसेच सर्वपक्षीय पॅनेलच्या भूमिकेचा खुलासा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. प्रा.के.डी. कांचन म्हणाले, हवेली तालुक्यातील बाजार समिती व यशवंत कारखाना या संस्था शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिल्या आहेत. या संस्थानी तालुक्याचा उत्कर्ष केला आहे. परंतु या संस्थांना नख लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले गेले आहे. बाजार समिती व कारखाना या संस्थांवर प्रदिर्घ काळ प्रशासक ठेवणे लाजीरवाणी बाब आहे.

 

या संस्थांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अधिपत्याखाली ठेवणे हे भूषावह असल्याने पुढील काळात संस्थांमधून बाजार समितीचा विस्तार व शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. आम्ही बाजार समिती चे शेतकऱ्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी झटत आहोत. त्यासाठी पुढील काळात आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु निष्ठेचा नावाखाली सुरू असलेली ‘मलई’ खाईचे धोरण गारटकर यांनी थांबवावे, तसेच आम्हाला निष्ठा दाखविणाऱ्या गारटकरांची संपूर्ण हयात कोठे गेली आहे?तसेच रातोरात भाजप उमेदवारांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी , तालुका तालुक्यात वेगळा राजकीय घरोबा असणाऱ्यांना उमेदवारी तसेच तत्कालीन बरखास्त संचालक मंडळातील कुटूंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आ.अशोक पवार यांची कोणती नैतिकचा शिल्लक असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला .

बाजार समितीचा १९ वर्षाच्या अस्तित्वाचा खेळ थांबवावा , बाजार समितीची निवडणूक व्हावी म्हणून आमचे उमेदवार  प्रशांत काळभोर यांची उच्च न्यायालयात लढाई केली तसेच बाजार समितीला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करणारे प्रदिप कंद, माऊली कटके आदी तालुक्यातील नेत्यांची मदत झाल्याने तालुक्यातील अस्मितेसाठी ही सर्वपक्षीय आघाडी झाली आहे. खुद्द शरद पवार यांनीही एका मुलाखतीत स्थानिक पातळीवर स्थानिक मुद्दांची सोडवणूक करण्यासाठी बाजार समित्यांच्या निवडणूकीला आघाडी करण्याचे गैर नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गारटकर यांनी हवेलीत येऊन निष्ठेच्या गोष्टी सांगू नये असा इशारा या नेत्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी चे पदाधिकारी व सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार प्रकाश जगताप व राजाराम कांचन उपस्थित होते.

 यशवंत कारखान्याची जमीन का खरेदी केली नाही ?

 हवेली बाजार समिती ही तालुक्याची असून या बाजार समितीचे उत्पन्न हे ५० कोटींचे आहे. बाजार समितीचा १८ वर्षात कोणता विस्तार झाला ? उपबाजारासाठी एका आमदाराची खरेदी केलेल्या १३ एकर जमिनीसाठी ६१ कोटी रुपये मोजले. परंतु ही जमीन बाजार समितीच्या मालमत्तेत का सामाविष्ट झाली नाही ? या जमिन खरेदी करण्यात तालुक्याचे काय हित दडले होते ? ज्या कारखान्याची जमिन खरेदी करुन शेतकऱ्यांची कामधेनू सुरू होणार होती मग यशवंत कारखान्याच्या मालकीची जमीन खरेदी करुन कारखाना चालू करण्यास का प्राधान्य दिले नाही ? असाही प्रश्न के.डी.कांचन यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!