लालपरीची व्हिडिओ बघितला का? अवस्था बिकट, छत तुटलेल्या एसटीचा व्हीडीओ व्हायरल…
गडचिरोली : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हीडीओ गडचिरोलीमधील लालपरीचा तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडीओमधील एसटीचा अर्धा पत्रा हा हवेत उडत आहे. तरी या एसटीचा चालक ही बस भरधाव वेगाने चालवत आहे.
सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन म्हणजे लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणे गडचिरोलीमधील प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. यामध्ये महामंडळाच्या एसटीचे छत उडाले तरी एसटी भरधाव वेगामध्ये सुसाट धावत होती.
लालपरीची बिकट अवस्था
हा व्हायरल व्हीडीओ गडचिरोली जिल्ह्यामधील आहे. या व्हीडीओमध्ये बसचे छत अर्धे तुटले आहे. तरीही या बसचा चालक ही बस वेगाने चालवत आहे. या एसटीच्या पुढे असणा-या एका व्यक्तीने हा व्हीडीओ काढला आहे.
पण महामंडळाच्या अनेक एसटीची अशीच अवस्था सध्या राज्यातील अनेक आगारांमध्ये असल्याचे चित्र आहे. काही एसटी बसच्या काचा फुटलेल्या आहेत, फाटलेल्या सीट आणि गंजलेला पत्रा अशा अवस्थेत सध्या ही लालपरी आहे. तरीही या लालपरीमधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात.
सध्या राज्यात एसटी महामंडळाची स्थिती फार बिकट आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या या बसचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्याला जोडण्याचे महत्त्वाचे काम ही लालपरी करत असते.