मुंबईतल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली ; सोपवली महत्वाची जबाबदारी, कारण काय?


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलांचा धडाका कायमच सुरू आहे.अशातच आता मुंबईतील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडून अचानक बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेतील सहआयुक्त लक्ष्मी गौतम, सहआयुक्त जय कुमार आणि सहआयुक्त डॉ. आरती सिंग यांचा या बदलीमध्ये समावेश आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता. निवडणुका आयोगाने त्यांची संवेदनशील राज्यामध्ये बदली केली आहे.आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई गुन्हे शाखेचे लक्ष्मी गौतम यांची आसाममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. जय कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये या आव्हानात्मक राज्यात बदली करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत होत असल्याने ते देखील एप्रिल अखेर पर्यंत बंगालमध्ये असणार आहे. गुप्तचर विभागाच्या प्रमुख डॉक्टर आरती सिंग यांना केरळला पाठवण्यात आले आहे.

या निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच निष्पक्ष निवडणूक पार पडावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!