हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…!

कोल्हापूर : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली आहे.
या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं.
त्याऐवजी त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावले. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरे गेले.
अखेर हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी तपास सुरू आहे.