लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळलयं का? कुठे आणि कसं पाहायचं? जाणून घ्या संपूर्ण माहिती..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता लाडकी बहीण योजनेत मोठे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. तब्बल १४ हजार पुरुषांनी या योजनेचा गैरवापर करत लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यासोबतच ६५ वर्षांवरील महिला आणि सरकारी कर्मचारी महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालं आहे.

त्यामुळे शासनाने स्क्रुटिनी पुन्हा सुरू केली असून, लाभार्थ्यांची नवी यादी तयार केली जात आहे. या स्क्रुटिनीच्या प्रक्रियेमुळे काही योग्य पात्र महिलांची नावं देखील यादीतून वगळली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे त्वरीत तपासणं गरजेचं ठरतंय. शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून, तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगइन करा. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लाभार्थी यादी किंवा अर्ज स्थिती पाहण्याचा पर्याय निवडा. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासा. जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. पण नाव नसेल तर तुम्ही वॉर्ड ऑफिस, ग्रामपंचायत किंवा महा-ई सेवा केंद्रात जाऊन रीतसर तक्रार दाखल करू शकता. यासाठी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जाईल आणि तक्रारीची दखल घेऊन निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, शासनाने आयकर विभागाच्या मदतीने नियमबाह्य लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. यामध्ये आर्थिक परिस्थिती, नोकरीची माहिती, वय व इतर निकष तपासले जात आहेत. यामुळे ज्या महिलांनी चुकीचा लाभ घेतला आहे, त्यांची नावं थेट यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र, काही योग्य पात्र महिलांची नावं देखील चुकीच्या वर्गवारीमुळे हटवली गेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नियम पाळून अर्ज केला असेल आणि तरीही तुमचं नाव यादीत नसेल, तर तातडीने यंत्रणेशी संपर्क करून योग्य ती कारवाई मागणं आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!