Haryana Vidhan Sabha 2024 : हरियाणातील निकालात मोठा बदल, बहुमताकडे गेलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर, भाजप आघाडीवर..


Haryana Vidhan Sabha 2024 : गेल्या महिनाभरात देशात हरियाणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. आज या दोन्ही राज्यातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. तसेच सकाळपासून आघाडीवर आणि नंतर बहुमताच्या दिशेने गेलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर आली आहे.

दुसऱ्या राऊंडनंतर भाजपने अचानक दमदार कमबॅक केले आहे. सध्या भाजप आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, निकालाच्या अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांच्या कलात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या राऊंडपासून काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीनंतर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर होती. काँग्रेस बहुमताच्या पुढे गेल्याने काँग्रेस हरियाणात सत्ता स्थापन करेल असा कयास वर्तवला जात होता. तर या राऊंडमध्ये भाजप ३१ जागांवर आघाडीवर होती. मात्र निकालात अचानक मोठा ट्विस्ट आला. Haryana Vidhan Sabha 2024

भाजपने अनपेक्षितपणे दमदार कमबॅक करत ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ३१ जागांवर आघाडी घेतली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षातील लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे हरियाणाच्या लाल मातीच्या कुस्तीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!