Haryana : हरियाणामध्येही लाडकी बहीण योजना गाजनार! काँग्रेसने दिली जाहीरनाम्यात हमी…
Haryana : मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात महिलांना दर महिन्यात अनुदान देणार्या बहुचर्चित लाडकी बहिण योजना प्रभाव काँग्रेस पक्षावरही पडला आहे. कारण हरियाणा राज्यातील १८ ते ६० वयोगटातील महिलांना दर महिन्यात दोन हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा पक्षाने विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (ता.१८ दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांची प्रमुख उपस्थित होते. Haryana
निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने राज्याच्या विकास आणि लोककल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास उत्तम प्रशासन आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ हरियाणातील नागरिकांना मिळवून देईल.
पक्ष राज्यात भ्रष्टाचारमुक्त कारभार सुनिश्चित करेल आणि शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या हितासाठी महत्त्वाची पावले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.