हर्षवर्धन पाटील यांची शेतकऱ्यांना गोड भेट! राष्ट्रीय अध्यक्ष होताच साखरेचा भाव केला ऐवढा..!!


नवी दिल्ली : राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्या नंतर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. या बैठकीत साखरेचा किमान विक्रीदर ४० रुपये करावा अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून एक अट लागू केली आहे. साखरेच्या ठरवून दिलेल्या कोट्यापैकी ९०% कोट्याची साखर विक्री करण्याचे बंधन घातले आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात साखर बाजारात येऊन साखरेच्या दरात क्विंटल मागे २५० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे साखर विक्रीच्या टेंडर मध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग कमी झाला आहे.

केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१९ मध्ये साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ३१ रुपय घोषित केला असून मात्र त्यानंतरच्या पाच वर्षाच्या काळात उसाचा दर प्रत्येक वर्षी वाढत गेला, मात्र त्या तुलनेत साखरेची किंमत वाढवली गेलेली नाही. हा वाढीव दर शेतकऱ्यांना वेळेत आणि पूर्ण देण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात आता वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या साखर नियंत्रण कायदा २०१८ मधील चौथ्या क्रमांकांची अट लक्षात घेता ऊस दराशी निगडित साखर विक्रीची किंमत ठरून ती आता वरती किलो चाळीस रुपयापर्यंत करण्याची गरज आहे. या दराबाबत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने देखील आपल्या अहवालात दुजोरा दिला आहे, हे केंद्र सरकारच्या निर्दशनास आणून देण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखालील बैठकीत घेण्यात आला आणि त्यांनर लागलीच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले.

शहा यांनी घेतली दाखल! अन्न मंत्रालयाबरोबर झाली चर्चा!
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अमित शहा यांनी तातडीने निर्देश दिले आणि त्यानुसार २९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा, साखर सहसचिव अस्वनी श्रीवास्तव, मुख्य साखर संचालक संगीत सिंगला व साखर विभागातील सर्व संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने देशभरातील साखर कारखाना तसेच संपूर्ण साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या विषयावर विस्ताराने मांडल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!