Harshvardhan Patil : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी! युतीत पुन्हा बिघाडी, बॅनरमध्ये नेमकं काय?


Harshvardhan Patil : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

विशेष म्हणजे या पराभवानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे बोट दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तरही देण्यात आले आहे.

अशातच आता राज्यात एक जोरदार चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याच कारण म्हणजे इंदापुरातील एक बॅनर कारणीभूत ठरलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आलेल्या गोष्टी पाहता इथे आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या घटना घडू शकतात, याचे संकेत मिळताना दिसत आहेत.

बॅनरमध्ये नेमकं काय?

इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा २०२४ असे या बॅनरमध्ये म्हंटले आहे.

या बॅनरमधला आशय आणि विमानाचं चिन्ह इंदापूरच्या राजकारणात खास आहे. कारण गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत बघायला मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होता. त्याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटील हे विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा आता रंगत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!