मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील अनेक कार्यकर्त्यांसोबत नरसिंहपूरमध्ये, राजकीय चर्चांना उधाण…

इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीरा नरसिंगपूर दौऱ्यावर होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील त्यांचं कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन त्यांनी घेतले. मुख्यमंत्री फडणवीस हे नरसिंहपूर येथे दाखल होण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील नरसिंहपूर या ठिकाणी मंदिरात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह हजर होते.
यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र यामध्ये दत्ता भरणे यांचा विजय झाला. यानंतर हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपमध्ये येथील असे म्हटले जात होते.
असे असताना मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील उपस्थित राहिल्याने चर्चांणा उधाण आलं. याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले, आज राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच इंदापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचं लक्ष्मी नरसिंह कुलदैवत आहे. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत,आमचंही ते पिढ्यापिढ्याचं दैवत आहे म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो.
आज सकाळीच मला समजलं की मुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा आहे देवदर्शन आहे. राजकारणात सगळेच सगळ्यांना भेटत असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. मंदिरामध्ये सगळे जुने मित्र भेटले त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्या’, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
तसेच ते म्हणाले, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. मंदिरामध्ये सगळे जुने मित्र भेटले त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्या’, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल.