Hardik Pandya : मोठी बातमी! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर, टीम इंडियाला मोठा झटका..
Hardik Pandya : विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्ध विश्वचषक सामन्यात हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झालीदुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्ध सामन्यात त्याला फक्त तीन चेंडू गोलंदाजी करता आली.
यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच चाहते हार्दिकच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही. Hardik Pandya
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियानं सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. यामध्ये ऑलराउंडर पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.