पुण्यात गणेशोत्सव काळात महिला -मुलींची छेड काढणाऱ्यांची धिंड काढून फोटो चौकात लावणार ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा


पुणे : गणेशोत्सवात महिला-तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंची धिंड काढून त्यांचे फोटो काढून भर चौकात फ्लेक्सवर लावले जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोडरोमियोंना दिला आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाची काळात गर्दीचा फायदा घेऊन रोडरोमिओंकडून महिला-तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहे. या

पार्श्वभूमीवर अशा छेड काढणाऱ्यांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांनी नामी उपाय शोधला आहे.

उत्सव काळात भाविकांना माहित आणि सुक्षेच्याबाबतीत गौरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून अठरा मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत चोवीस तास ही मदत केंद्रे सुरु असणार आहेत. या केंद्रावर स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत.

शहराच्या मध्यवस्तीत प्रमुख सहा ठिकाणी पोलिसांच्या शीघकृतीदलाची पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर ही पथके पहारा देणार आहेत. त्यासाठी मचान बांधण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली आहे. दहा दिवस त्यांच्याकडून उंचावरून सर्व हालचालीवर त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाणार आहे.

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा चोरटे भाविकांचा लाखोंचा ऐवज लंपास करतात. खास चोऱ्या करण्यासाठी परराज्यातील चोरटे पुण्यात या काळात दाखल होतात. मोबाईल चोरट्यांची संख्या तर फार मोठी असते. कोट्यावधी रुपये किंमतीचे मोबाईल शहरातून चोरी होतात. महिलांचे दागिणे, पैशांची पाकिटे अशा ऐवजावर हात साफ करतात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताची खास जिम्मेदारी गुन्हे शाखेच्या पथकांवर देण्यात आली आहे. गुन्हे शाखेने आत्तापासूनच याबाबत प्रतिबंधात्मक कामाला सुरुवात केली आहे. चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची पोलिसांकडून यादी करून ही कारवाई करण्यात येते आहे. त्याचबरोबर परराज्यातून येणाऱ्या चोरट्यांवर सुद्धा लक्ष केंद्रीत करून त्यांचे रेकॉर्ड जमा केले जाते आहे.

  1. गणेशोत्सव कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी काम सुरू केले आहे. उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्याची आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबात पोलिस गंभीर आहेत. छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. असे गैरकृत्य करणाऱ्यांचे फोटो काढून पोलिस शहरात फ्लेक्सवर लावणार आहेत. तसेच त्यांची परेडही घेतली जाईल हे लक्षात ठेवावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!