घराच्या परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचा सब इन्सपेक्टरचा मृतदेह


केरळ : पोलीस सब इन्स्पेक्टर बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोच्चीमधील अंगमालीजवळून समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस सब इन्स्पेक्टर बाबूराज (वय ५५) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२७ मार्च ) बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. एका आठवड्यापूर्वीच त्यांना अलुवा पूर्व पोलीस स्टेशनमध्ये नवीन नियुक्ती मिळाली होती. त्या आधी ते केरळ पोलीस दलातील स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. अंगमाली पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की बाबूराज यांनी असं टोकाचं पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

घटनास्थळी सुसाईड नोट किंवा तत्सम काहीही सापडलेले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. पोलीस त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी या घटनेची नोंद केली आहे.

दरम्यान, बाबूराज यांचा मृतदेह त्यांच्याच घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी शंका वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरी या बाबत काहीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!