‘द केरला स्टोरी’ चित्रपट बनवणाऱ्याला फाशी द्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी…!
पुणे : सध्या सगळीकडे द केरला स्टोरी या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट आल्यापासून वादात सापडला आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
द केरला स्टोरी’ चित्रपट हा केरळला बदनाम करणारा आहे. याच्या निर्मात्याला फाशी देण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे. द केरला स्टोरीच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे.
या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणा-या व्यक्तीला सार्वजनिकरीत्या फाशी दिली पाहिजे, असे आव्हाड म्हणाले आहेत. हा चित्रपट लव्ह जिहाद सारख्या वेगळ्या मुद्याला स्पर्श करत आहे.
हा चित्रपट हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील काही गोष्टींवर प्रकाशही टाकतो. या चित्रपटाला भाजप शासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे.