Hair Care : मेंदीने द्या केसांना नवे जीवन! केसांची देखभाल कशी करावी जाणून घ्या…


Hair Care पुणे : केसांच्या देखभालीसाठी मेंदीहून चांगला पर्याय दुसरा नाही. व्रतवैकल्याच्या दिवसांत भारतीय परंपरेनुसार शांपूचा वापर वर्ज्य मानला जातो. अशा वेळी मेंदी केसांसाठी नैसर्गिक व उपयुक्त हर्बलचे काम करीत असते. Hair Care

मेंदीने केसांची देखभाल :

जेवढी गरज असेल तेवढी मेंदी पावडर घ्यावी. ती एखाद्या लोखंडी भांड्यात कालवावी. कालवताना तिच्यामध्ये तेवढेच पाणी घालावे जेणेकरून मेंदी जाम वा जेलीचे रूप घेईल. मेंदी उकळलेल्या चहापावडरच्या पाण्यात कालवल्यास केसांना चमक मिळते. हवी तर आपण हिच्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर व दोन-तीन थेंब लिंबाचा रस टाकू शकता. हे कंडिशनिंगचे काम करते. शक्य असल्यास ही पेस्ट रात्रभर ठेवावी. जर शक्य नसेल तर आपण ती दोन-तीन तासांनंतरही लावू शकता.

वापरण्याची पद्धत :

बऱ्याचदा मेंदी उत्तम असूनही योग्य पद्धतीने लावली नाही तर त्याचे फायदेही चांगले मिळत नाहीत. सर्वप्रथम केस उत्तम शांपूने धुवावेत. केस सुकल्यानंर त्यांच्यावर मेंदी लावावी. केस वेगवेगळ्या अनेक बटांमध्ये विभागून घ्यावेत. हेअर ब्रशने प्रत्येक बटेवर डोक्यापासून मेंदी लावायला सुरुवात करावी. मेंदी लावताना ती संपूर्ण केसाला एकसारखी लावावी. मेंदी लावल्यानंतर ती किमान अर्धा ते दोन तास ठेवावी. मेंदी नैसर्गिक रूपानेच सुकवावी. यामुळे केसांना उत्तम कलर येईल. सुकल्यानंतर केस चांगल्या प्रकारे पाण्याने धुवावेत.
——

       

आणखी काही वेगळ्या टिप्स :अपचन झाले, तर घरगुती उपाय :

अपचन झाल्यास पोट जड होणे, जिभेवर पांढरा थर जमणे, पोट दुखणे व फुगणे, दिवसभर सुस्त वाटणे, अंग मोडून आल्यासारखे वाटणे यांसारखी सामान्य लक्षणे असतात. अशावेळी पुढील घरगुती उपचार करता येतील.

– जेवणापूर्वी अर्धा चमचा जिरे पुड व एक दोन चिमुट सुंठीचे चूर्ण लिंबाच्या रसाबरोबर घ्यावे.
– जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा चिमुटभर सैंधवाबरोबर चावून वर गरम पाणी प्यावे. जेवताना मधेमधे आल्याचा तुकडा हिंग व सैंधव लावून खावा.
– जेवणानंतर एखादी लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चघळल्याने पचनास मदत होते. दुपारच्या जेवणानंतर एक वाटी ताजे ताक, अर्धा चमचा जिरेपुड, चिमुटभर सुंठ व किंचित सैंधव टाकून घ्यावे.
– अपचनावर सर्वांत सोपा व खात्रीचा उपाय म्हणजे उपवास व हलका आहार हा होय. दुपारी हलके जेवण करून रात्री काहीही खाऊ नये किंवा केवळ मुगाचे कढण, पालकाचे सूप या प्रमाणे द्रव आहार करावा.
– दिवसभर गरम पाणी प्यावे. जेवणाच्या वेळ नियमित ठेवाव्यात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!