Hair Beauty : महिलांनो असे उजळवा आपल्या केसांचे सौंदर्य, जाणून घ्या…


Hair Beauty  उरुळीकांचन : आपले केस आपले रूपसौंदर्य उजळण्यात नक्कीच संजीवनी बुटीचे काम करीत असतात. केस सुरक्षित व सुंदर राहण्यासाठी केसांची सफाई जेवढी आवश्यक असते तेवढेच ते दिवसांतून तीन-चार वेळा विंचरणे, यासोबतच गरज असते तेलमालीशची. तरीही आपले केस गळत असतील तर खालील उपाय आजमावून पाहायला हवेत. Hair Beauty

दही तांब्याच्या भांड्यात ते हिरवे होईपर्यंत घोटावे. ते लावल्यास केसगळती थांबून केस वेगाने वाढतात.

१०० ग्रॅम कडुलिंबाची पाने १ लिटर पाण्यात उकळा. त्याने केस धुवा व कडुलिंबाचे तेल लावा.
कोबीच्या रसाने जर एक महिनाभर रोज मालीश केले तर केस गळणे बंद होईल.
५० ग्रॅम नायजेला बिया प्रति लिटरपाण्यात उकळा. या पाण्याने केसधुतल्यास एका महिन्यात केस
खूपच लांब होतात.

कडुलिंबाची आणि बोराची पाने पाण्यात वाटून डोक्याला लावावीत. दोन-तीन तासांनंतर केस धुवावेत. यामुळे केस गळणे बंद होईल.
कांद्याचा रस व मध समप्रमाणात एकत्र मिसळून लावल्यास केस गळायचे बंद होतात.

आता काही वेगळे : ओठांची लाली वाढविण्यासाठी काही खास…

सौंदर्य वाढविण्यात ओठांची  उपायभूमिका महत्त्वाची आहेच. थंडीच्या दिवसात तर ओठांकडे थोडेही दुर्लक्ष झाले तर ओठ फुटतात, रक्त येतं. म्हणूनच थंडीच्या दिवसात आणि नेहमीसाठी ओठांचं सौंदर्य बाढविण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी हे हमखास उपाय करा

बीटरूट : बीटरूटचा उपयोग ओठावरील टॅन घालवण्यासाठी होतो. जमेल तेव्हा बीटरूटचा एक तुकडा, ओठांचा मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवत रहा. लिपस्टिकच्या अतीवापरामुळे झालेले नुकसान कमी होण्यास याचा उपयोग होतो.

कोवळी काकडी : काकडीचा ब्युटी ट्रिटमेंटमध्ये जसा त्वचा सौंदर्यासाठी जादुई उपयोग होतो तसाच ओठांसाठीही होतो. काकडीचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा ओलावा वाढण्यास उपयोग होतो. तसेच काळसरपणा आला असेल तर दूर होतो.

मध-साखरेचा स्क्रब : ओठांना मध आणि साखरेने तुम्ही स्क्रामिंग करू शकता, मधात साखरेची बारीक पूड मिक्स करून तुम्ही एक घरगुती स्क्रब करू शकता. या मिश्रणाने ओठांचा हळुवार मसाज करा, ओठावरील डेड स्कीन निघून जायला यामुळे मदत होते. परिणामी ओठ गुलाबी आणि लवचिक होण्यास यामुळे मदत होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!