हडपसर ते यवत उन्नत कामाला लवकरच होणार शुभारंभ; कामाच्या शुभारंभापूर्वीच पर्यायी वाहतुकीचे व्यवस्थापन गरजेचे; जिल्हा प्रशासन, एनएचएआय कसे नियोजन साधणार?

जयदिप जाधव

उरुळीकांचन : जागतिक किर्तीच्या स्तरावर अंतर्भाव करुन विकसित होणाऱ्या हडपसर ते यवत व वाघोली ते शिरुर या एलिव्हेटेड मार्गांच्या कामांना लवकरच शुभारंभ होण्याची शक्यता निर्माण झाली असून या जागतिक दर्जाच्या उन्नत मार्गांची टेंडर प्रक्रिया अंतिम होऊन विकसक कंपनीच्या नियुक्त्या करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असून प्रकल्प शुभारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकसित मार्गावर वाहतुकीचे नियोजन कसे करणार म्हणून? तर या जिकीरीच्या मुद्दाकडे कसे नियोजन साधणार म्हणून या नियोजनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे – सोलापूर व पुणे- अहिल्यानगर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर जागतिक किर्तीचा महामार्ग उभा राहत आहे.या दोन्ही मार्गांसाठी दुमजली उड्डाणपूल उभा करुन प्रवासी वाहतुक व मेट्रोची रचना करण्यात आली आहे. पुणे उपनगरात पुणे-सोलापूर व पुणे- अहिल्यानगर या मार्गांवर प्रचंड वाहतुक कोंडी असून या मार्गावर विनाअडथळाही हा महामार्ग वाहतुक कोंडीने त्रस्त आहे.

अशा स्थितीत या महामार्गावर उन्नत मार्गासाठी विकसक कंपनी टप्प्या-टप्प्यांत कॉलम उभारुन उड्डाणपूलासाठी काम सुरुवात होणार असून या कामांसाठी प्रचंड उत्खनन,साधनसमग्री वाहतुक तसेच जागेचे अधिग्रहण होणार असल्याने विकसक कंपनी,जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या ठिकाणीकशारीतीने निर्माण होणारा वाहतुक प्रश्न सोडवून या कामाची सुरूवात
करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
पुणे -सोलापूर उन्नत मार्गांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिशेने असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावर वाहनांची मोजणी, माती परिक्षण, भूर्गर्भातील खडकांचे निरीक्षण तसेच इतर सर्व्हे सुरू केला आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन विकसक नियुक्त होऊन मंत्रिमंडळ मान्यता मिळून या या कामाला महिना व दिड महिन्यात हिरवा कंदील मिळणार आहे. तत्पूर्वी वाहतुक कोंडीची शक्यता लक्ष्यात घेता या मार्गावर वाहतुक कोंडीसाठी प्रशस्त मार्ग करणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे या अत्यावश्यक बाबी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पूर्ण करण्याचा गरज बनल्या आहेत.
या महामार्गासह या भागातून जाणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाचे काम सध्या सुरुवात करण्यात आले आहे. अशास्थितीत रिंग रोड व राष्ट्रीय महामार्गांचे काम हे दोन्ही एकाच वेळी होणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. या महामार्गांवर कामाचा कालावधी अद्याप ठरवून दिला नसला तरी महामार्गांची उपनगराची आवस्था पाहून वाहतुकीचे पर्यायी नियोजन करुन कामांना सुरुवात होणे गरजेचे आहे.
मेट्रो स्टेशन व रॅम्प ठिकाणी भूसंपादन…
हडपसर ते यवत मार्गात लोणीकाळभोर पर्यंत मेट्रोची रचना आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त जमीनीची गरज भासणार आहे. तर उड्डाणपूलाच्या चढ उतार ठिकाणी रॅम्पची रचना होणार असल्याने भूसंपादन होणार असल्याची प्रशासनाकडून मिळाली.
” उन्नत मार्गाची विकसक कंपनीची लवकरच नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी शासन म्हणून महामार्गाचे सर्व्हेक्षण, माती परिक्षण, भूर्गर्भातील परिक्षण सुरू आहे. कंपनीची नियुक्ती झाल्यानंतर वाहतुक नियोजनाचा पर्याय शोधूनच काम सुरू होईल”
-संतोष भंपेलवार, कार्यकारी अभियंता ,एनएच